df-76a867a2-ae07-4c41-ae49-8912c59572ea

Vishal
2 hours agoAria s1
चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. आई बाबांवर रुसलास का? असाच एकटा बसलास का? आता तरी परतुनी जाशील का? दुध न शेवया खाशील का? चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल. असाच बसून राहशील का? बाबांची बोलणी खाशील का? चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा चांदोबा कुठे रे गेला? दिसता दिसता गडप झाला. हाकेला 'ओ' माझ्या देशील का? पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?